अध्यात्मिकमर्यादा आपल्या जीवनामध्ये अनेक मर्यादा आणि नियम लावुन दिलेले आहेत. त्या नियमांच्या संचाला धर्म अशी सौज्ञा दिली आहे.अन्न दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे परंतू अन्नदान कोणी आणि कोणाचा करावेत याचेही नियम आहेत. उदा.एखाद्या श्रींमत माणसाने गरीब लोकांना अन्नदान करणे हे श्रेष्ठ पुण्याई चे काम ठरते.श्रीमंताने श्रीमंतालाच अन्नदान करणे हे अन्नदान नसून एक हौस असु शकते यात ना पाप ना पुण्य मग हेच पुण्य गरीबाच्या पदरी कसेकाय पडेल याचं प्रमाणेशास्त्रा मध्ये सगीतलेल्या सर्व दानप्रक्रिया अन्नदान वस्त्रदान स्वर्णदान भूमिदान इतर सर्व दाणामध्ये दान देणारा सक्षम व दान घेणारा अक्षम असायला पाहिजे तरच ते योग्य तरच ते योग्य ठरेल .अन्यथा स्वताच्या मोठेपणा करिता केलेला उपद्व्याप समजावा ? ...