सत्य शोधक संस्कृती

सत्य शोधक संस्कृती आणि संशोधन
भारतीयसत्य शोधक या नावाखाली कित्येकांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर विचार,तत्व आणि सिद्धांत
मांडले
परंतु त्यांनी  मांडलेले सिद्धांत सत्यच आहेत हे सिद्ध होऊ शकले नाहीत त्यांनी आपले मत व्यक्त
करण्याचा मार्ग निवडला आणि तो जगाला पटउन सागण्याचा प्रयत्न केला उदा:देव आहे काय ?
याचे उत्तर देतांना होय,नाही आहेतर कोठे आहे .माणूस ,आत्मा मूर्ती,नीर्गुण,सगुण,शक्ती अशा अनेक
प्रकारची उत्तरे मिळतात त्यात सत्य काय आहे हे शोधण्या ऎवजी आपले मत समाजावर लादण्याचा
आटोकाट प्रयत्न गेला .जसे अंधश्रद्धा  म्हणजे अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे दोन भाग झालेत
आणि त्यवर तत्व व सिद्धांताचे मनोरे उभे केले वस्तुत: श्रद्धा हि आंधळीच असते. डोळस श्रद्धा असूच
शकत नाहीज्याप्रमाणेअंधश्रद्धा हा  शब्द वापरात येतो तसाच डोळस श्रद्धा हा शब्द वापरात येत नाही
तो शब्द अस्तित्त्वातच नाही तरीही यांनी वांझेच्या पुत्राचे बारसे केलेच
दुस-या एका संशोधन काराने सांगितले कि ज्ञानेश्वर महाराज झालेच नाही कारण ज्ञानेश्वर महाराज हे
एक आहेत कि  तीन आहे हे कळतच नाही त्यने  ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरी व अभंगाच्या
रचनेवरून सिद्ध करून दाखविले काही लोकांना ते पटले. असे  संशोधक सिद्धांत मांडतात तर
त्यांनाबुद्धिवान म्हणावे कि मूर्ख तेच कळत  नाही जेव्हा त्याची
बुद्धी काम करत नाही तेव्हा ते म्हणतात हे सर्व काल्पनिक आहे हा त्यंचा शेवटचा पर्याय असतो
गुलाबराव महाराज  म्हणतात तर्काने सत्त्यता सिद्ध करता येते परंतु तो तर्क जे सिद्धकरायचे आहे
त्याच्या अनुसरून असला पाहिजे विद्रूप असल्यास  सत्त्यता सिद्ध करता येत नाही ह्या जगात
असंख्य अशी तत्वे आहेत कि जे सिद्ध करता येत नाही कुठलेही पुरावे नसतांना, कुठलेही ज्ञान
नसतांना आपण त्याचा श्रद्धेने स्वीकार करतो उदा;डॉक्टर,वकील ,संत ,कायधा ,देव माता पिता ,
वैज्ञानिक ,अशा किती तरी ठिकाणी आपण अंधश्रद्धा वापरतो कारण आपल्या कुठल्याहि वस्तूचे
परिपूर्ण ज्ञान नसते याचाच अर्थ आपण सर्व अंधश्रद्धा च वापरतो त्याच निर्मुलन कसे कराल आणि
दुसर्याचा अनुभव हा आपले ज्ञान होऊ शकत नाही .
डॉक्टर ने दिलेल्या ओशधाबद्द्ल पेशण्टला काहीही माहित नसते तरीही आपण त्यांच्यावर अंधश्रद्धा
ठेऊन उपचार घेतोच ना ?आपल्या भारतीय संविधाना बद्द्ल बहुताउश लोकांना कायदा माहित नाही
तरीही त्याचा स्वीकार करतातच हि अंधश्रद्धा नाहीकाय दाभोळकरांच्या मते अनुभवाशिवाय किंवा
प्रत्यक्ष ज्ञानाचा पुरावा असल्या शिवाय ते मानणे अंधश्रद्धा आहे .आपण जीवनातील ८० %कार्य
आणि ज्ञान हे परावलंबी असते ते सत्य कि असत्य हे माहित नसते आणि त्यांच्या शिवाय आपण
अपूर्ण जगणे अवघड ठरते .      
जयहिंद
--------------------------------------------------------------------------------------
                 स्वयमसिद्ध वैदिक धर्मस्वमत सिद्धांत
एखाद्याला व्यक्तीला दारूचे व्यसन लागावे आणि तो आता दारू शिवाय जगूच शकत नाही
हा सत्य पुरावा असला तरी यावरून -दारू शिवाय  जीवन जगणे अशक्य असते  असा सिद्धांत
माडणे उचित आहे ?ह्या विज्ञान वादि लोकांना कुठल्याही गोष्टीचा वैज्ञानिक  पुरावा असल्या शिवाय
ते सत्य मानत नाहीत .वरील उदाहरण सत्य आहे मग त्यावरील सिद्धांत मानावा का ?
ह्या जगातील ब-याच गोष्टी तर्क आणि काल्पने बाहेर आहेत जे कुठल्याही  पुराव्याने सिद्ध करता
येत नाही.दुध असे असते हे कोत्या पुराव्याने सिद्ध अरु शकाल ?जगात  दुधाशिवाय दुसरा
कोणता ही पदार्थ तत्सम नाही त्याला प्रत्यक्ष दूधच पुरावा आहे आणी अशाच सिद्धांतावर
अध्यात्मिक, दैविक ,ईश्वरीय तत्व उभे असते ते स्वताहाच स्वयमसिद्ध असतात त्याला दुस-या
कुठल्याही प्रमाणाची गरज नसते 
                             जयहिंद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

स्वाध्याय अतिक्रमण