अमृतानुभव
अमृतानुभव कौमुदी पुस्तकाचे नाव: अमृतानुभव कौमुदी लेखक: श्री बाबाजी महाराज पंडित प्रस्तावना: डॉ. धुंडिराज विनोद. -१- अमृतानुभव हे एक सूर्यबिंब आहे. श्री श्री श्री बाबाजींनी त्या सूर्यबिंबाचे किरण महाराष्ट्रीय जनतेच्या अंत:करणात परावर्तित करण्यासाठी या कौमुदी नामक प्रभातरल महाभाष्याचा आविष्कार केला आहे. ही ‘कौमुदी’ अवलोकन करताना बुद्धीच्या डोळयांना शीण पडत नाही, ते दुखावत नाहीत, सुखावत असतात आणि सारखे सुखावलेलेच राहतात. अंत:चक्षूंना तर ही ‘कौमुदी’ म्हणजे भव्य-दिव्य नेत्रोत्सव वाटतो. या ‘अमृतानुभव कौमुदी’च्या शांत मधुर प्रकाशामागे श्री. गुलाबराव महाराज यांच्या आत्मप्रभेचा ठाणदिवा व श्रीज्ञानेश्वर माऊलीचा प्रसादचंद्रमा, अशी दोन तेजो-बिंबे अद्वयानंद-वैभवांत विलसत असल्याचा मला तरी स्वयंस्पष्ट प्रत्यय येत आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलीने गुलाबराव महाराजांना जो ‘अमृतानुभव’ दिला, जी ‘अपरोक्षानुभूति’ दिली, ‘जे ये हृदयीचे ते हृदयी घातले’ ते संविद्रहस्य कौमुदीच्या रजतरसात महाराष्ट्रजनतेसाठी श्री बाबाजी महाराज पंडित यांनी साकार करून ठेवले आहे. -२- श्री शंकराचार्यांची ‘अपरो