धर्म आणि संविधान



धर्म आणि संविधान
धर्म म्हणजे नैतिक मूल्यांचे जतन करण्याचे सूत्र आहे .आणि हे सर्वच धर्मांमध्ये आढळतात कारण हाच धर्माचा पाया आहे . तरीही ’’सर्वधर्म समान असतात,,हे मला मान्य नाही .कोणत्याही धर्मामध्ये एक तत्व समं असले तरी इतर अमेक तत्व विषम असतात. म्हणूनच सर्व धर्म समान म्हणता येत नाही .हिंदू धर्मामध्ये आंतरिक विषमता असूनहि सर्वोच्च आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे आशा आहे की आपल्याला नक्की आवडेल ........    
,, सर्वधर्मसमभाव ,,हि फक्त कल्पना आहे ती सत्त्यात उतरणे शक्य नाही ज्यांनी ज्यांनी हि कल्पना मांडली त्यांच्या सानिध्यात राहून पहा म्हणजे कळेल खर काय ते. अधिकारी आणि अनधिकारी ह्या दोन शब्दावर सर्व वाद चालू असतो आणि अतिरेक व नंतर वाद असा कर्म चालतो -----
प्रत्येक धर्म तत्वांची रचना काळ,क्षेत्र,भाषा परत्वे इतर वातावरणाला अनुसरून अनुकूल असे बनविलेले असते ,
हिंदू धर्म हा फार पुरातन धर्म आहे येथूनच इतर सर्व धर्म तत्वांची निर्मिती झाली आहे .त्यात मानव धर्म हा नवीन आहे आणि तो धर्म असूच शकत नाही,फार फार तर आपण त्याला जात म्हणू शकतो इतर सर्व प्राण्यांच्या मध्ये मानव हा एक प्राणी आहे म्हणून मानव जातीचा प्राणी असे म्हणता येईल, जगातील सर्व धर्मांमध्ये कुठेही मानव धर्माचा उल्लेख नाही.
मानव धर्म ,अंधश्रद्धा ह्या सारखे शब्द कुठेही नाहीत हे अलीकडील बुद्धिवादी लोकांच्या बुद्धीचे तरंग आहेत .ज्यांनी हिंदू धर्माला वेठीस धरले आहे जगावर प्रेम करायला सर्वच धर्म शिकवतात परंतु आपले नीतिमूल्ये जपून !!
ज्यांनी मानव धर्म निर्माण केला ज्यांनी स्थापना केली आहे त्यांनी कोणती नितीमुल्ले {धर्माचे कायदे } तैय्यार केलीत !
माणूस जर सर्व बाजूंनी मोकळा असेल तर तो धर्मच काय कामाचा बंधनाशिवाय माणूस अधर्मीच राहील बर्ताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे प्रत्येक भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले हे सत्य आहे मग कायद्याचे बंधन कशाला पाहिजेत ! थोडी कल्पना करा ..कायद्याचे बंधने काढून टाकले तर काय होईल ?
त्याच प्रमाणे धर्मामध्ये बंधने असणे हे समाज व्यवस्था सांभाळण्याचे सूत्र आहे आणि ते आवशक आहे.
त्यात काहीना त्याचा त्रास होत असेल !आजही आपल्या कायद्यामुळे बऱ्याच लोकांना त्रासदायक होतो अडचणी येतात कुठलाही कायदा सर्वांसाठी सारखा असूच शकत नाही आजपर्यंत कुठल्याही देशात झाला नाही.अधिकार परत्वे कायदा बदलतो तद्वत धर्म तत्वे सुध्दा अधिकार परत्वे बदलतात त्यामुळे चोर,दरोडेखोर,खुनी,अवैध [वैदिक नसलेला] मार्गाने पैसा कमविणारे यांनाही त्रास होतोच.तसेच अधर्म किंवा अवैध मार्गाचा अवलंब करणारास अडचणी येतात काही त्यांचे उल्लंघन करतात परिणामी दुखः भोगतात .....
धर्मामध्ये कुठलेही तत्वे अनावश्यक नसतात .परंतु त्याचा वापर कधी करायचा कधी करूनये यथे धर्ममार्तंडांन कडून चुका होतात. कायद्या मध्ये          
       राष्ट्रपती राजवट आहे परंतु त्याचा वापर कुठेही केला जात नाही योग्य वेळेस तो कायदा वापरात येतोच कधी समाजाच्या कल्याणा करिता तर कधी मंत्र्यांच्या फायद्या करिता. तसेच धर्म तत्वे सुध्दा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरले जातात त्यात काहींना त्रास होणारच,
 काहींच्या मते हिंदू धर्म ब्राम्हणांच्या ताब्यात आहे म्हणून त्यांनी अतिरेक केला तर काही म्हणतात ब्राम्हणांनी निर्माण केला ...कायद्याची निर्मिती करणाऱ्याच्या हाती कायधा नसतो कायधा ज्यांच्या हाती आहे ते स्पेशल डिपार्टमेंट आहे ते म्हणजे पुलिस दल मगकाय पुलीसांनी कायधा लिहिलंय का? परंतु ते कायद्याचा दुरुपयोग करू शकतात . यावरून कायदाच चुकीचा आहे असे म्हणणे मुर्खपणाचे नव्हे का? धर्म शास्त्राचे हि असेच असते .......
आजही कायद्यामध्ये बदल नकरता गरजेनुसार नवीन कायदे निर्माण केली जातात एखाद्याच्या अडचणी साठी कोणी नवीन संविधान लिहिणार नाही तसे करायचे म्हटलेच तर त्याला काय म्हणावे आपण जनताच ...........
धर्म शास्त्रामध्ये सुद्धा काळ परत्वे नवीन कायद्याची रचना केली गेली आहे असे आढळते पुढेही करता येऊ शकते .परंतु आजचे महाभाग नवीन धर्म स्थापन करून संघटीत समाजाचे तुकडे करायला निघाला आहे ह्यांना देश द्रोहीच म्हटले पाहिजे कारण समाज धर्माच्या आश्रयाने संघटीत होतो हा आज पर्यन्तचा इतिहास आहे समाजामध्ये फुट पडणे हा एक राष्ट्र द्रोह आहे याने देशाची एकता खंडित होते .
हिंदू धर्मावर आक्षेपार्ह भाषण करणारे ,लिहिणारे बरेच निर्माण झालेत तरीही त्यात काही गैर नाही परंतु आपलाच हिंदू म्हणून घेणारा जेव्हा अभद्र भाषण करतो तोच खरा हिंदू धर्माचा शत्रू असला पाहिजे आणि हेच आपले दुर्दैव आहे .
नंदकिशोर म कुबडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

स्वाध्याय अतिक्रमण