कोण म्हणतो "हिंदू" शब्द हा अरब लोकांनी शिव्या म्हणून दिला....? जो असे म्हणेल त्याला खालील गोष्टी सांगा......!
🕉 हिंदू शब्द हा अंदाजे कमीत कमी ५००० वर्ष जुना आहे.
🔸१. "शब्द कल्पद्रुम" जो दुसऱ्या शतकात रचला आहे,त्यात पुढील एक मंत्र आहे -
||"हीनं दुष्यति इति हिंदूजाती विशेष:"||
(अर्थात, हीन कामाचा त्याग करणार्याला हिंदू म्हणतात.)
🔸२. "अदभुत कोष" मध्ये एक मंत्र येतो -
||"हिंदू: हिन्दुश्च प्रसिद्धौ दुशतानाम च विघर्षने"||
(अर्थात, हिंदू चा अर्थ दुष्टांचा नाश करणारा असा होतो.)
🔸३. "वृद्ध स्मृती" (सहावे शतक) मध्ये पुढील उल्लेख आहे -
|| हिंसया दूयते यश्च सदाचरण तत्पर: वेद् हिंदु मुख शब्द भाक् ||
(अर्थात, जो सदाचारी वैदिक मार्गावरून चालतो, हिंसे मुळे ज्याला दुख होते, तो हिंदू आहे.)
🔸४. "बृहस्पति आगम"(हा ग्रंथ कधीचा आहे माहित नाही) यात पुढील उल्लेख आढळतो -
||"हिमालय समारंभ्य यवाद इंदु सरोवं। तं देव निर्मितं देशं, हिंदुस्थानम प्रचक्षते ||
(म्हणजे, हिमालय पर्वतापासून इंदू (हिंद) महासागर पर्यंत जो प्रदेश देव-पुरुष ह्यांनी तयार केला त्याला हिंदुस्तान म्हणतात.)
🔸५. "मेरुतंत्र" नामक प्राचीनतम हिंदू ग्रंथात हिंदू शब्दाची व्याख्या अशी आहे -
।। हीणानि गुणानि दूषयति इति हिंदू ।।
(अर्थात, जो हीन, वाईट अश्या रज-तम दुर्गुणांचा नाश करतो तो हिंदू होय.)
🔸६. इस्लाम चे पैगेम्बर मोहम्मद साहब यांच्या जन्मापूर्वी १७०० वर्ष आधी एक अरब कवी होऊन गेला, त्याचे नाव "लबि बिन अख्ताब बिना तुर्फा" त्याने केलेल्या भारतदेशा विषयीच्या लिखाणात उल्लेख आढळतो -
||"अया मुबार्केल अरज यू शैये नोहा मिलन हिन्दे। व अरादाक्ल्लाह मन्योंज्जेल जिकर्तुं ||
( अर्थात, हे हिंद ची पुण्यभूमी, तू धन्य आहेस, कारण देवाने आपल्या बुद्धीने तुला निवडले आहे. )
🚩"गर्वाने सांगा मी हिंदू आहे...!"
बंधूंनो, ही पोस्ट शेअर करा आणि हिंदू धर्माबद्दल वाईट बोलणार्यांच्या बुद्धीभेदास योग्य ती उत्तरे द्या. हिंदू धर्मावर होणाऱ्या विषारी टिकेस कणखर प्रत्युत्तर देणे हि धर्मसेवाच आहे !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

स्वाध्याय अतिक्रमण