अस्पृश्यता
बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता -महावीर सांगलीकर भारतातील जातीवाद आणि अस्पृश्यता याबद्दल हिंदू धर्माला जबाबदार धरण्यात येते. ब्राम्हणांनी जाती तयार केल्या व कांही जातींना अस्पृश्य ठरवले असा ब्राम्हण विरोधकांचा एक लाडका सिद्धांत आहे. पण प्रत्यक्षात जाती बनण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. अगदी सिंधू संस्कृतीत सुद्धा जाती आणि उच्चनीचता होती. फार तर असे म्हणता येईल की समाजातील या जातीवादाचा ब्राम्हणांनी आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला. अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला एक कलंक आहे असे महात्मा गांधी म्हणायचे. अस्पृश्यता ही ब्राम्हणांची देणगी आहे असे सर्वसाधारण मत आहे. ते खरे असेल नसेल, पण बौद्ध धर्मात जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता होती आणि आजही आहे हे वाचल्यावर वाचकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण हातच्या काकणाला आरसा कशाला? चला आपण वेगवेगळ्या बौद्ध देशांमध्ये बौद्ध लोक कशी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता पाळतात ते पाहुया. भारतातील लडाख भागात 'ओरिजिनल' बौद्ध धर्म आणि त्याचे अनुयायी आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था तर आहेच पण हे बौद्ध धर्मीय लोक अस्पृश्यतेचे पालनही करतात. विशेष म्हण