स्वाध्याय अतिक्रमण

पांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार

...म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला
पांडुरंगशास्त्री आठवल्यांनी दशावतारावर अनेक प्रवचने दिली. त्याचे संकलन ‘दशावतार' या नावाच्या पुस्तकात स्वाध्याय परिवारातर्फे करण्यात आले आहे. माझ्याकडे या पुस्तकाची ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली दुसरी आवृत्ती आहे. स्वाध्याय परिवारातर्फे चालविल्या जाणा-या सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ही हेटाळणी कुटाळकीच्या पातळीवरची आहे.  तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला, असा खोटा प्रचार आठवले करतात.
पुस्तकातील ‘अवतार मीमांसा' नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे.  या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत :
.ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले..१.
आज वारकरी सांप्रदाय महाराष्ट्राचा मुख्य धर्म आहे...
‘...दर एकादशीच्या दिवशी आळशी आणि निष्क्रिय लोक एकत्र होतात व ओरडून सांगतात : ‘प्रभो! ह्या जगात फार घाण साचली आहे. तू ये आणि ती सगळी काढून टाक.' पण अशा ओरडण्याने भगवंत येणार नाही, हा शास्त्रीय सिद्धांत आहे.... गीतेच्या भाषेत सांगायचे झाले तर परित्राणाय साधूनाम' असेल, सज्जन ईश्वरकार्य करीत असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी भगवान येतो. चोरांनी लुटलेल्या मालाची वाटणी करीत असताना होणारी भांडणे मिटविण्यासाठी तो येत नाही...२'
कारणाशिवाय अवतार होत नाही. ‘न ऋतश श्रांतस्य सख्याय देवा:' हा वैदिक सिद्धांत आहे. एकादशीच्या दिवशी सर्वांनी एकत्र जमून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही. ‘हा दगडाचा देव आहे', अशा आक्रोशाने तो पाझरणार नाही...'३१५ दिवसांनी येणा-या एकादशीला दिवसभर उपवास करणे आणि रात्री संतांच्या भजनाचा जागर करणे, हा वारकरी धर्म आणि अन्य वैष्णव पंथीयांच्या धर्मश्रद्धेचा पाया आहे. पायावर घाव घातला की इमारत आपोआप कोसळेल, असा अंदाज बांधून पांडुरंग बुवा आठवले यांनी एकादशीच्या उपवासाला आणि संतांच्या भजनाला थोतांड ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एकादशीच्या दिवशी सर्वांनी मिळून आक्रोश केला तरी प्रभू तो ऐकत नाही' असे आठवले म्हणतात. येथे वारकरी हा शब्द वापरण्याचे आठवले टाळतात. हे कपटनाट्य आहे. याला नथीतून तीर मारणे म्हणतात. पण आठवले यांच्या विवेचनात एकादशी आणि भजनाचा (ज्याला आठवले आक्रोश म्हणतात) उल्लेख असल्यामुळे हा हल्ला वैष्णव आणि वारक-यांवरच आहे, हे स्पष्टच आहे. या पुढे जाऊन आठवलेबुवा एकादशीला संतांची भजने म्हणणा-यांना (म्हणजेच वारक-यांना) आळशी, निष्क्रिय अशी विशेषणे लावतात. इतकेच नव्हे तर या भोळ्या भक्तांची चोर-लुटारू अशी संभावना करण्याचा नतद्रष्टपणाही करतात. वारक-यांची अशी  अवहेलना आठवले अनेक ठिकाणी करतात.
थेट विरोध करून वारक-यांचा विचार संपविला जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर विषमतावादी ब्राह्मणी विचारांच्या पुरस्कत्र्यांनी आता छुप्या पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी उभा केलेला स्वाध्याय परीवार याच मार्गाने चालला आहे. महाराष्ट्रातील समतावादी वारकरी विचार संपवून विषमतावादी जातीय विचार रुजविणे हेच स्वाध्याय परिवाराचे मुख्य लक्ष्य आहे. पांडुरंगशास्त्री आठवल्यांच्या पुस्तकातील उतारे पाहिले की, स्वाध्याय परिवाराचा छुपा अजेंडा लक्षात येतो.समताधिष्ठित वारकरी सांप्रदायाला संपवून ब्राह्मण वर्चस्ववादी धर्माची स्थापना करण्यासाठी स्वाध्याय परिवाराचा जन्म झाला आहे,
समतावादी वारकरी विचार संपवून विषमतावादी जातीय विचार रुजविणे हेच स्वाध्याय परिवाराचे मुख्य लक्ष्य आहे.'दशावतार' या पुस्तकात आलेले या विषयावरील विवेचन भयंकर विषारी आहे.५. शास्त्रीबुवांनी स्वाध्याय परीवारासाठी निवडलेल्या योगेश्वर कृष्णाच्या मूर्तीचे कॉपीराईट घेतले आहे. १९८५ साली त्यांनी मूर्तीचे कॉपीराईट घेतल्याचे सांगितले जाते. या मूर्तीसारखी दुसरी मूर्ती कोणालाही बसविता येत नाही. २००७ साली जळगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात योगेश्वर कृष्णाची मूर्ती बसविण्यात आली होती. स्वाध्याप परीवाराच्या वतीने तक्रार करण्यात आल्यानंतर ही मूर्ती तेव्हाच्या जळगाव पोलीस अधीक्षकांनी जप्त केली होती४. स्वाध्याय परीवाराने अजून तरी अधिकृतरित्या हिंदू धर्मापासून फारकत घेतलेली नाही. याचा अर्थ सर्व जनता स्वाध्याय परीवाराला अजूनही हिंदूच समजते.
६. स्वाध्याय परीवाराच्या सर्व दैनंदिन प्रार्थना संस्कृतात आहेत. खेड्यापाड्यातील अज्ञानी लोकांच्या त्या गळी उतरविण्यात येत आहेत.
माझा प्रश्न : यातूनही दोन प्रश्न निर्माण होतात. प्रश्न १- संस्कृत मंत्रांचे अत्यंत चुकीचे उच्चार खेड्यातील लोक करतात. त्यातून अर्थाचे अनर्थ होतात. अर्थ समजत नसल्यामुळे हे त्या गोरगरीब लोकांच्या लक्षात येत नाही, एवढेच. मराठी संतांनी संस्कृताला दूर सारून लोकभाषा मराठीत ग्रंथ रचना केली. स्वाध्याय परीवार उलटी गंगा वाहवून लोकांना पुन्हा संस्कृताकडे नेऊ पाहत आहे. परीवाराला लोकभाषेचा एवढा तिटकारा का? प्रश्न १- चुकीचा मंत्र म्हटल्यास अयोग्य फळ मिळते, असे वेदांत म्हटले आहे. वृत्रासुराच्या आईला इंद्राला मारणारा मुलगा हवा होता. ब्रह्मदेवाकडे वर मागताना तिने विसर्ग चुकीच्या ठिकाणी वापरला. त्यामुळे तिला इंद्राकडून मारला जाणारा वर मिळाला. या संबंधीचा -यजमानम् हिनस्ती- हा संस्कृत श्लोक फार प्रसिद्ध आहे. अशा फलप्राप्तीला जबाबदार कोण? 
सारांश : वरील सर्व चर्चेचा सारांश काढताना मला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने दिसतात. स्वाध्याय परीवाराने स्वतंत्र धर्म निर्मितीच्या दिशेने प्रयत्न चालविला आहे. त्यात काही चूक आहे, असे नाही. या देशात कोणालाही कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. तसेच आपले स्वतंत्र धर्ममत प्रतिपादन करण्याचा अधिकार आहे. स्वाध्याय परीवाराला स्वतंत्र धर्मस्थापना करायवयाची असल्यास कोणाचीच हरकत नाही. फक्त त्यांनी त्यातील छुपेपणाचा त्याग करावा. उघडपणे आपले मत प्रतिपादन करावे. हिंदू धर्माच्या अडून त्यांनी हे उद्योग करू नये. छुपेपणा ही संघाची कार्य पद्धती आहे. त्याच मार्गाने स्वाध्याय परिवार चालला आहे

टिप्पण्या

  1. अरे तुला कोठे माहीत त्यांचा सांगण्याचा उद्देश काय आहे ते कुत्रा कितीही भुंकला तरी वाघ होत नाही हे लक्षात ठेवायला पाहीजे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती