क्षत्रिय माळी


     क्षात्रधर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उत्तर भारतात मालव, मोहेल, यादव, सोळंकी, चव्हाण, पवार, वाघेला, ही मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमात असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले. अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले. त्यातून'क्षत्रिय माळी' ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली. याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी, सैनी माळी, माशीमाळी, काशीमाळी, जिरेमाळी, हळदी माळी आदि पोटभेद पडले. सर्व माळी क्षत्रियांचे गोत्र आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठय़ाचे एक असल्याने शहाण्णव कुळात त्यांची आडनावे आहेत. क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे. सैनी, श्रीमाळी, वीरमाळी, करमाळी, गंधमाळी, मालव, मालो, माला, काछी, दासी, दोसी, बागवान, राऊत, सागर, आहार, अहरी, अंध, अंदी , मैना कहार, खईरा, वाघीलवाल आदि. मुस्लीम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते.
     मराठा माळी-मराठा माळी हे कुणबी असावेत, पुढे धंद्यावरून वेगळी जात बनली. त्यांच्यात फुलमाळी, अद्यप्रभू, अद्यशेटी, बावणे, हळदे, जिरे, काच, कडू, क्षीरसागर, लिंगायत, पदे, उंडे आदि तेरा पोटभेद आहेत. मात्र यात प्रामुख्याने फुलमाळी , हळदे, जिरे, काच माळी यांची संख्या जास्त आहे.
 
    फुलमाळी हे फुलांचा व्यवसाय करणारे असून, त्यांनाच सावतामाळी असेही म्हणतात. या समाजातील लोक आपल्या पागोट्याला फुलांचा गुच्छा लावत नाहीत. तसेच चप्पल बुटांवर फुलांची नक्षी काढत नाहीत. जिरे माळी हे जिरे पिकवित तर हळदे माळी हे हळद पिकवित त्यांना त्यानुसार पोटजातीचे नाव मिळाले असावे, असे म्हटले जाते.
फुले, फळे, भाज्या, ऊस, हळद, जिरे आदि बागायती पिके काढणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. क्षत्रिय माळी- क्षात्रधर्म या गं्रथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उत्तर भारतात मालव, मोहेल, यादव, सोळंकी, चव्हाण, पवार, वाघेला, ही मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमात असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागले. अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावयास सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले.
त्यातून 'क्षत्रिय माळी' ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली. याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी, सैनी माळी, माशीमाळी, काशीमाळी, जिरेमाळी, हळदी माळी आदि पोटभेद पडले. सर्व माळी क्षत्रियांचे गोत्र आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठय़ाचे एक असल्याने शहाण्णव कुळात त्यांची आडनावे आहेत. क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद असे. सैनी, श्रीमाळी, वीरमाळी, करमाळी, गंधमाळी, मालव, मालो, माला, काछी, दासी, दोसी, बागवान, राऊत, सागर, आहार, अहरी, अंध, अंदी , मैना कहार, खईरा, वाघीलवाल आदि. मुस्लीम समाजातील बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे सांगण्यात येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वाध्याय अतिक्रमण

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती