रासट्रसंताचा धर्मद्रोह

 १ ] आपणची मंदिर मूर्ती पुजारी | आपणची पुष्पे होऊनी पूजा करी ||
आपणची देवरूपे अंतरी |पावे भक्ता |१ \२||
-->१ पासून ते १० \१२ --| पर्यंत विश्वव्यापक रचना केली . अशी विश्वात्मक भावना असताना सत्य लपले कोठे हाच मोठा प्रश्न आहे??? संत .संन्याशी ,धर्म .शास्त्र .पंथ .सप्ताह तीर्थ .यात्रा .सर्वांचा अपमानित केले
२  ]पुण्यक्षेत्र पंढरपुरी |बैसलो असता चंद्रभागे तीरी ||
स्पुरू लागली ऐसे अंतरी |विश्वाकार वृत्ती  |१ \४४ ||
-->दगडाच्या देवाने ग्रामगीता लिहिण्याची स्पुर्ती दिली आणि त्यांच्या विरोधात सिद्धांत मांडलेत
 मुर्ती पूजेच्या विरुद्ध अनेक भजने लिहिली आहेत , आणि हा सर्व हेतूपुरस्कर विरोध आह||५||
मूर्ती जायचे स्मारक |त्याच्या गुणकर्माची नाही भूक |
मूर्तीच देव ठरवोनी लोक |करीती अति वेडेचार ||
     || सुंदर समन्वय साधला || 
३ ] निपुत्रिकास अधोगती |ऐसे जे ग्रंथवेत्ते म्हणती |
त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ती |दुसरी होती ||७५||
  भारती ऐसा काळ आला |संन्यासी देती ज्याला त्याला |
महत्त्व न दयावे लग्नकार्याला |ऐसे झाले ||७६||
   ज्याचे त्याने तप करावे |ऐसे धरले बहुतांच्या जीवे |
म्हणोनी हे बंधन घालावे |लागले ग्रंथकर्त्या ||७७||
पुत्र व्हावा कुल-उदधारी |एरव्ही ती वांझची बरी |
ऐसेही बोलिले निर्धारी |ग्रंथामाजी ||७८|| 

·    ४] विशालता गेली मानवाची |रचना केली जाती पंथाची |
|कामाची होत्ती ती कायमची |विभागणी माथी बैसली |१ \५९||
-->चातु चातुर्वर्ण्यं मया सृष्टम ,गीता,,, हि समाज व्यवस्था आहे काळ परत्वे यात बदल झाले आहे [किणी ऐक व्यक्ती नाही कि ज्याने जाती धर्म तयार केले असेल] .असे तत्व गरजेनुसार स्वयंनिर्माण असतात.आजही जाती-धर्म-पंथ.ह्या शिवाय समाज व्यवस्था निर्माण करणे हे संविधानला सुद्धा जमले नाही त्यातही अनुसूचित जाती जमातीचा विचार करावा लागला.    
आणि महाराजांनी वर्ण व्यवस्था अ ५ वा मध्ये सुंदर समन्वय साधला आहे  
· ५     नको सत्तेचा बडगा त्यासि |नको दंडभय सत्कर्मासी  |आपापले कर्म सर्वासी |धर्म शिकवी सर्वागे ||१०||
  धार्मिक त्यासची म्हणावे |सत्तेवाचुनी वागे बरवे | स्वये आपुल्याची स्वभावे |समरस होई सर्वाशी ||११||
  नको वैद्य अथवा डॉक्टर |आपणची राहे आरोग्यतत्पर|  नको न्यायाधीश दंडधर |न्यायव्यवहार सहजची                                                                                                              
  नको धाक  तरवारीचा| चुकीस्तव तळमळे आत्मा साचा |साक्ष देतो अंकुर देवाचा |अंतरामाजी ||१३|| 
  ऐसे ज्याचे ह्दयी स्फुरण |तोची खरा धर्मवन |बाहय अवंडबर धर्मचिंन्ह  |ते ते गौन,धर्म नव्हे ||१४||
-->शास्त्र-पुराने सांगतात म्हणून ते चूक आहे परंतु महाराज सांगतात म्हणून योग्य आहे ते खालील प्रमाणे ....शास्त्र संमत असतांना स्वमत मांडणे.शास्त्र खोटे ठरविणे हा त्यांचा स्वभावच होता असे म्हणावे लागेल खालील -वरील दोन्ही ओव्या जोडून बघा
.अ ८ मध्ये काय सांगतात ते पहा
परंतु भयावाचुनी काही लोक |न एकतीच बोध सम्यक |दंडांविन जैसे पशु देख |न चालतीच योग्य मार्गे ||१६ ||
त्यांना हित कोणी शिकवावे?|कोणी मूर्खाचे हृदय धरावे ||म्हणोनी सत्तेने सरळ करावे |ऐसा मार्ग वाढवा ||१७ ||
-->  उत्क्रांती वाद-क्रमविकास का? मान्य करावा .माकडापासून माणूस झाला हे भारतीय तत्व नाहीत. महाराजांना ते मान्य असेल  
·    ६]मानव पशुयोनीतून आला |नराचा नारायण होणे त्याला ||यासाठी संस्कार देऊनी सावरीला |क्रमाक्रमाने ||२\२८ ||
  -->शास्त्र संमत असतांना स्वमत मांडणे.शास्त्र खोटे ठरविणे हा त्यांचा स्वभावच होता असे म्हणावे लागेल
 * उदा;-आठ वर्षाचे आतची त्याला |पाहिजे उपनयन संस्कार केला ||
तोही नको रुढीचा बांधला |नाटक नुसते बटूचे ||४८||
-->महाराज ब्राम्हणाचे कट्टर विरोधी होते हे ह्या ओवीतून सिद्ध होते शास्त्र ब्राम्हण सागतात ते नाटक रा.संत सांगतात ते खर असे का ?
 उपनयन म्हणजे विद्येचे व्रत|ब्रम्हचर्याश्रमची सुरुवात |गुरुजवली करणे समर्पित |जीवन त्याचे घडवावया ||४९||
 म्हणोनी म्हणतो वैराग्यासाठी |घर सोडणे नको उठा उठी ||त्यासाठी पाहिजे बुध्दी गोमटी |सेवाभावना त्याग वृत्ती ||५१||
-->ह्या दोन ओवींचा संदर्भ लाऊन बघा शास्त्र द्रोह दिसेल
आपुले घर सोडूनी दयावे |गावची घर समजोणी राहावे ||सर्व गावचे काम करावे |देव सेवा म्हणोनी ||५२
[म्हणोनी हे चुकची आहे |तो सन्यास सन्यासची नोहे ||वानप्रस्थची संन्याशी राहे |धोका न होय मुलाऐसा ||६४ ||
१०-२० ओव्या अशाच पद्धतीच्या आहेत ..........
झुडच्या झुंड मुले नेती|कोणी बैरागी संन्याशी करिती ||आणि मग बोके होऊनी फिरती |लोकांमाजी ||६८ ||
-->  संन्याशाचा किती आदर रा संतांच्या मनात आहे हे स्पस्ट दिसते 
सवे घेउनी आपुली पत्नी | सेवा करिती मिळोनी दोन्ही ||हेची आहे वैराग्याची निशाणी |संसार संग सुटाया ||७८ ||
फक्त हाच कामाचा आहे
आणि कोणी निरासक्त झाला |संन्यास घेउनी वनी गेला ||तोही नाही उपेगा आला | समाजाच्या ||८० ||८३|८४|८५|८६|| निरासक्त झाला तरी कामाचा नाही .रा संत सा तेच सत्य बाकी सर्व असत्य असे क?
म्हणोनी म्हणतो वैराग्यासाठी |घर सोडणे नको उठा उठी ||त्यासाठी पाहिजे बुध्दी गोमटी |सेवाभावना त्याग वृत्ती ||५१||
मानावे सकळांचे आभार |करावा परस्परांसी पूरक व्यवहार ||असो सन्यासी वा गृहस्थ नर | सारखा अधिकार सर्वांचा ||११२ ||
||११३||११४ |------>ह्यांना समान अधिकाराचा रोग लगला आणि शास्त्र .धर्माचॆ उल्लघन केले
*पुत्रधर्म पाळता पुत्र श्रेष्ट |पीत्रूधर्म पाळता पिता वरीष्ट ||येथे म्हणावे श्रेष्ट कनिष्ट |कोणी कोणा ||११५ ||
पाया तेनेची पडावे ज्याने आपुल्या कर्मासी चुकावे ||नाहीतरी प्रेम ठेवावे ||परस्परचे दोघांनी ||११६ ||
-->माता .पिता गुरु शिष्य सर्वाना समान अधिकार असू शकतो का ?
इश्वरे जग केले निर्माण | त्याचे कार्य अजुनी अपूर्ण ||ते आपापल्यापरी कराया पूर्ण |सदबुध्दी दिली मानवा ||१ ||
-->देवाला जमले नाही ते मानवाला जमेल का?
उपजले ते नसे |नासिले ते पुनरपि दिसे |हे घटिकायंत्र जैसे |परिभ्रमे गा ||ज्ञा ||हेच सृष्टी निर्मिती चे सूत्र आहे .
यासाठीच झाले अवतार | यासाठीच संत भक्तांचा व्यवहार ||सुखी करीन अवघाची संसार |ब्रीद तयांचे  ||९ ||
-->हा संसार भवतिक आहे .संतानी सांगितलेला संसार[जन्ममृत्युचा ] अध्यात्मिक आहे
||१०|| गाव सुधारल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही.....
-->महाराजांनी ग्राम सुधारण्याचे कार्य सुंदर केले परंतु अध्यात्मिक मार्ग विस्कळीत करून ठेवला
* कधी काळी करिती भजन |घरोघरी बोलावया  जाऊन ||तुटका वीणा टाळ दोन | मृदंग गेला कामातुनी ||३५ ||
ऐसा झाला तालतीतंबा |विस्कळीत झाल्या कीर्तने सभा ||म्हणती दया यावी रुक्मिणीवल्लभा |आपुली सुद्ध्ची नाही ||३८
 ----->महाराजांनी ग्राम सुधारण्याचे व्यतिरिक्त इतर पंथात विशेष वारकरी पंथात जास्त हस्तक्षेप केलेला दिसतो .
विवाहा आधी परस्पराने |पाहावे दोघांनी निश्चयाने ||विचारस्वातंत्र्य दोघाशी देणे | अगत्याचे ||११ ||
जुळता दोघांचे विचार |विकास पावेल कारभार ||दोघांची उत्साह शक्ती अपार |कार्य करील सेवेचे ||१४||
--->पाच दहा मिनिटात तर दोघांचे विचार जुळणार नाहि कमीतकमी १०/१५दिवस तरी एकांतात ठेवायला पाह्हीजे
 
** मृत  शरीरास पितांबर |घरी नसल्यास विका घर |दुख भोगा जन्माभर |ऐसे कोणी न करावे ||३०|
-->किती लोकांनी घर विकले. यालाच म्हणतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा .प्रत्येक ठिकाणी ह्यांनी अतिशोक्तीच केली 
असेल तैसेचि वागावे |जुनेही वस्त्र स्वच्छ करावे |खुशाल अंगी बांधोनी न्यावे |मृताचिया गरिबांनी ||३१||
नवेची वस्त्र पाहिजे आणिले |ऐसे शास्त्राने जरी सांगितले |तरी आमुच्या घरचे कैसे चाले |नाही ठाउके शास्त्रासी ||३२||  सर्व जाती-जमाती मिळून |हळदीकुंकू,तिळगूळ,सुवर्णदान |चढाओढी,ग्रामशुद्धी,रामधून |भाषणे आदी करावी ||...महाराज म्हनसागते तात म्हणून सुवर्ण दान करा .पण शास्त्र सांगते म्हणून प्रेतावर कापड आणू नका ?
-->एक वस्र जर मुलगा आणू शकत नाही तर तो पुत्र नव्हे  शास्त्रचा विरोध करून समाज सुधारत नसतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

स्वाध्याय अतिक्रमण