शास्त्र द्रोह

 
तुपावाचोनी नको भोजन |हे शास्त्रवाचन पाळतो कोण ?मग मृतासीच तूप चोळाया जाण |शास्त्रवचन का सांगावे ?||३३|
          सर्व भोजनी उत्तम भोजन |ज्यात गोधृतदुग्धतक्रपण ||sh समजावे अमृताचे सेवन | शरीरासाठी ||१२७ ||
--->शास्त्रचा विरोध हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे
कीर्ती तोची स्वर्ग खरा |अपकीर्ती नरकाचा पसारा |याच जगी यांचा व्याप सारा |पाहती प्राणी ||६३||
एरव्ही स्वर्गस्थळीही गेले |तरी कुकर्म,दुःखाची देवेंद्राला |नव्याण्णव यज्ञे करोनि झाला |सर्प नहुष अहंकारे ||६३||
म्हमोनी कर्यातची स्वर्ग-नर्क |सकाम ग्रंथाचे फोल कौतुक |मिथ्या कल्पनात भुलले लोक |स्वर्थियांच्या ||६४|
-->शास्त्र पुराने जे सांगतात ते सर्व काल्पनिक आहे आणि राष्ट्रसंत सागतात ते सत्य ?
काही सज्जन तीर्थासि जाती |अस्थि-राख भरोनि नेती |म्हणे गंगोदके नाहीशि होते पापे त्याची ||८५||
कांश्या तु मरणान्मुक्ती |एसी लोकी वळली भ्रांती?|गंगाजळी किडेही मरती |तरी ते काय मुक्त झाले ?||८६||
--->मोक्ष देऊनी उदार |कशी होय कीर |परी वेचे लागे शरीर |तिये गावी ||ज्ञानेश्वर महाराज आदी संत तीर्थाचे समर्थन करतात आणि राष्ट्रसंत   तिरस्कार                 
सर्व जाती-जमाती मिळून |हळदीकुंकू,तिळगूळ,सुवर्णदान |चढाओढी,ग्रामशुद्धी,रामधून |भाषणे आदी करावी ||३१||
-->
 एरव्ही तीर्थी धोंडापानी |देव रोकडा सज्जनी |एसीच वदली संतवाणी |गर्जोनिया ||४९||
  --->राष्ट्रसंत  गलत अर्थ काढतात ..समोहम सर्व भूतेषु ;गीता
तीर्थी दगड धोंडा पाणी |देव रोकडा सज्जनी ||तुकाराम महा अन्वय अर्थ ;-तीर्थी. दगड. धोंडा. पाणी. सज्जनी .देव रोकडा ;-ह्या सर्व ठिकाणी देव रोकडा आहे विठ्ठल जळी स्थळी भरला |रिता ठाव नाही उरला ||तुकाराम महाराज 
आपुलाले चिन्ह ठेवावे |त्यावरोनि संप्रदाय ओळखावे |
म्हणोनी मांडिले दुकान बरवे |आपापले या पंथांनी ||९||
  --->राष्ट्रसंतांनी वेगळे काय केले .आपला वेगळा पंथ काढला ,वाक्य गुरुदेव आणि चिन्ह भगवी टोपी
करावयाचे ते कोणी न करी |भांडणे करिती घरोघरी |
वा रे !मूर्तीपूजेची थोरी |कळली लोकां ||२७||
--->मूर्ती पुजेची इतकी इर्षा तर इतर धर्मीय सुद्धा करीत नाही
सज्जनाने दगड पूजिला |इतरांना तो मोठा देव झाला |
वाळला त्याचा लोकांकी भला |यात्रा भरली त्यापरी ||३७||
पांडरीसी ज्ञानदेव न जाता |संतांचा मेळा न भरता |
कोण तेथील देव पूजिता?|सांगा मज ||३८||
-->म्हणजे ज्ञानेश्वर म अगोदर पंढरपुरी देव कोणी पूजित नव्हता असेच ना ?शेवटी विठ्ठलाला दगड हीच पदवी दिली
राष्ट्रसंत  यांच्या वाणीतून देवाला दगड हि उपाधी अनेक वेळा मिळाली आहे .
सोडोनिया ऐसा स्वाभाव |आपण सेवेसि अर्पावा जीव-भाव |
दालीतसमाजा मानोनि देव |सेवा करावी हाची धर्म
-->जर सर्व ठिकाणी सारखा आहे तर विशेष अनुरोध का?
देव सर्वाठायी सारखा |परी संगतीने भासे प्रिय सखा |
उत्तम असोनीही होतो पारखा |लोभी,लबाळ पुजार्यामुळे ||३९||
-->हा प्रश्न तर महाराजांना विचारायला पाहिजे .स्वताचे दुकान चालवण्यात दुसर्याची निंदा करायला नाही चुकले
कीर्तन,उत्सव,प्रवचन |नुसते नसावे मनोरंजन |
गावकर्यांचे उजळेल जीवन |ऐसे कार्यक्रम करावे ||१००||
--->
म्हणे नको ब्रम्हज्ञानादी भाव |आत्मस्थितीची गौरव |
आम्ही भक्त,तू चहूकडे देव |ऐसे करी आम्हांसि ||७६||
-->आपल्या फायद्यासाठी तुकाराम महाराजांच्या अभंगात घोळ केला , म्हणे नको ब्रम्हज्ञानादी भाव|मी भक्त तू देव ऐसे करी ||  मध्येच चहूकडे हा शब्द घातला हा घोळ बर्याच ठिकाणी आहे
नगारा जातो एकीकडे |टाळ-घंट्याचा गोंधळ उडे |
टाळ्या कसल्या,गारपीट पडे |ऐसेचि वाटे ||८||
-->

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

क्षत्रिय माळी

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

स्वाध्याय अतिक्रमण