स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता
स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता भारत हा मजबूत कुटुंबव्यवस्था आणि विविध प्रकारचे नातेसंबंध यामुळे ओळखला जातो. तथाकथित पाश्चिमात्त्य संस्कृतीमुळे आधीच काही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होत आहे. त्यात वेगवेगळे कायदे करून सरकार किंवा न्यायालय आणखी ते नातेसंबंध बिघडविण्यात हातभार लावत आहे. ***भाग १ : मुलगा आणि मुलगी या नात्यातल्या "मुलगी" कडून असणारे कायदे: *** पारंपारीक प्रथेनुसार वडील आपल्या मुलाला शिक्षण देवून मोठे करतात आणि मोठेपणी मुलगा त्यांना सांभाळतो. मुलगा मुलगी समानता यामुळे मुलीलाही मुलाच्याच तोडीचे शिक्षण आज पालक देतात. मुलीचे लग्न करतांना हुंडा मिळूनही मुलगी नोकरी करते आणि तो पगार सासू-सासऱ्यांना ती देते. किंवा आजकाल त्याला हुंडा न म्हणता आम्ही स्वखुशीने देतो से म्हटले जाते. आणि सरकार इकडे कायदा करतं की-सासऱ्याच्या संपत्तीवर सूनेचा हक्क नाही. असे कसे काय बुवा? मग सुनेचा पगार सासू-सासऱ्यांना कसा चालतो? तो मग तीने आई-वडीलांना दिला पाहिजे. मुलगा मुलगी समानता आली असे वाटत असतांनाच स्त्रीधार्जिण्या कायद्यांमुळे अम