वैद्य राज यांच्या निरोगी अशा दहा बोटे
हाताच्या स्पर्शाने रोग्यास शांती आणि धैर्य प्राप्त होत असते. तीच नाडी
परीक्षा स्पर्श हा मानसिक आणि शारीरिक असा दोन प्रकारचा असतो. कारण मन आणि
शरीर ही दोन्ही ही सुख- दु:ख यांचे आधार आहेत हा स्पर्श जेथे अपेक्षित आहे.
तो भाग म्हणजेच नाडी होय. अर्थात ह्या नाडीच्या रक्तवाहिनिच्या
स्पर्शावरून आंतरिक घडामोडी व असंतुलन जाणूनच औषधी दिली जाते. म्हणूनच नाडी
परीक्षा आपले अनन्यसाधारण महत्व ठेऊन आहे. नाडी परीक्षा हि काही
जादूविद्या किंवा मांत्रिकविद्या नाही.हे एक शास्त्र-विज्ञान आहे. पण आज
असे नाडीवैद्य फारच कमी आहेत. आतातर नाडी परीक्षा हि फक्त केवळ हृदयाचे
स्पंदन मोजण्यापुरतीच आहे.
अजीर्ण -: अजीर्ण झाले असता नाडी कठीण आणि चहू बाजूने जखडल्या सारखी चालते. मंद-मंद दुर्बल असते.
मुळव्याध -: यात नाडी कधी मंद, कधी वक्र तर कधी मृदू गतीने चालते.
मलावरोध -: मलावरोध असेल तर नाडी बेडका सारखी उडया मारत चालते.
आमवात -: ह्यात नाडीची गती स्थिर व निश्चित अशी चालते.
उदरशूल -: ह्यात नाडी वक्र गतीने व वेगाने चालते.
कृमी -: पोटात जंत झाले असतील तर नाडी तिन्ही गतीने चालते.
कावीळ -: ह्यात नाडी उष्ण गुणाने व बेडकाच्या गतीने चालते.
मधुमेह -: नाडी गाठीसारख्या स्पर्शाची चालताना वाटते व सुक्ष्म गतीची जाणवते
नाडी विज्ञान..
नाडी परीक्षा यालाच आयुर्वेदात
नाडीपरीक्षा म्हणतात. हे एक स्पंद्नाचे शास्त्र आहे. शरीर क्रियांच्या
मध्ये सर्व क्रिया प्रक्रियांचे ते एक अप्रतिम तंत्र आहे. वैद्य आपल्या
हाताची तीन बोटे धमनीवर (नाडीवर) ठेऊन शरीरात होणाऱ्या बदलांचे ज्ञान
नाडीच्या स्पंदनावरून करून घेतो. त्याच्या हाताची तीन बोटे प्रत्येकी
वेगवेगळी असंतुलन तीन मूलद्रव्ये आहेत. शरीरातील चलन, वलन पाचन, संहनन हे
प्रत्येकी वात, पित्त, कफ या दोषांमुळे होत असते. जेव्हा या दोषांच्या
प्राकृतीक अवस्थेत बिघाड होतो तेव्हा रोग निर्माण होतात. जेव्हा रोग शरीरात
असतो तेव्हा ह्या दोहोंची जी स्थिती असते तिच्या मधील तरतमता, क्षय,
वृद्धी यांचे जे स्पंदन असतात ती स्पंदने वैद्य आपल्या बोटांच्या सहाय्याने
अनुभूत करतो आणि कोणत्या दोषांचे किती असंतुलन हे लक्षात घेऊन उपचार करतो.
वातदोषांचे स्पंदन सापाच्या गती सारखे वेडेवाकडे जाणवते व ते
प्राधांन्याने तर्जनी अर्थात अंगठ्याजवळील बोटास स्पंदित होते. मधल्या
बोटास पित्ताचे स्पंदन अर्थात बेडकाच्या गती सारखे जंपिंग (टून टून ) असे
वरखाली जाणवते. तर कफाचे स्पंदन तीसऱ्या बोटास हंसाच्या चाला सारखे किंवा
हत्तीच्या चाली सारखे मंद मंद, हळू हळू असे जाणवते. ह्या स्पंदन गती मध्ये
कमी, वाढ, विकृत अतिमंद अतिजमाद किंवा परस्परांमध्ये मिसळून एक अतितीव्र तर
दुसरे मंद अशा विविधतेने शरीराच्या दोषस्थिती नुसार स्पंदने असतात आणि
वैद्य हि स्पंदने अनुभूत करतो आणि मग ती वात, पित्त, कफ या दोषांच्या
प्राकृतिक स्वस्थ कार्यगुणांशी पडताळत झालेल्या बदलांचे ज्ञान करून घेत
रुग्णास सांगत असतो. नाडी हे शरिर क्रियेचे स्पंदन आहे. नाडी परीक्षेने
रोगाचे मुळ कारण शोधले जाते जर आपण मुळ रोगकारणाची चिकित्सा केली तर मात्र
रोग समूळ नष्ट होऊ शकतो. आजच्या विज्ञान नष्ट लोकांना हि नाडी परीक्षा एक
थोतांड वाटते. तेव्हा हा काही एक चमत्कार नाही हे एक शास्त्र आहे. नाडी
परीक्षा म्हणजे शरीरातील बदलांचे सर्व संकेत अनुभव करते. आज काल बरेच लोक
डॉ.कडे येउन वेदना, अस्वस्थता, पचनाच्या तक्रारी, झोप न येणे असा अनेक
तक्रारीघेऊन येतात. तेव्हा डॉ. ‘सायक्रोसोमॉटीक’ म्हणून झोपेच्या गोळ्या
देऊन बोळवण करतात असे अनेक लक्षणे वा रोग शरीराच्या एका वेगळ्या सूक्ष्म
स्तरावरिल असंतुलनाचा परिणाम असतो. आलोचक पित्त असंतुलीत असेल तर डोळ्यांचा
त्रास, पाचकपित्तामुळे पचनाच्या तक्रारी, डोकेदुखी बरेचदा तर्पक कफाच्या
असंतुलनामुळेही बसू शकते. ह्या आजारात टेस्ट नार्मल असतात. पण रुग्ण मात्र
आजारीच असतो. म्हणून यासाठी वात, पित्त, कफ यांचे संतुलन करणे योग्य ठरते.
आणि त्यासाठी नाडीस्पंद्नाच्या गतीचेज्ञान लाभकर ठरते. शरीर असंतुलनाची एक
सूक्ष्म प्रतिक्रिया जी तयार होते. तिचे प्रदर्शित होण्याचे एक माध्यम
म्हणजे नाडी स्पंदने होय. इलेक्ट्रोनिक्सच्या शब्दात बोलायचे झाले तर नाडी
ही ‘ट्रान्सड्युसर’ आहे. हे इलेक्ट्रिक उर्जेला म्यकेनीकल ऊर्जेमध्ये
परावर्तीत करीत असते. नाडीच्या स्पंद्नातुन वैद्य या मेक्यानिकल उर्जेचे
स्पंदन अनुभवीत असतो. हि जी स्पंदित होणारी उर्जा आहे. तिचे स्पंदन यावेळी
आपणास इलेक्ट्रोकेमिकल स्पंदनाचे संदेश पोहोचते करीत असतात. शरीरात कुठेतरी
अवयवात असंतुलन आहे ते असंतुलन व त्याचे सर्वत्र शरीरात प्रक्षेपण होत
असते, त्यामुळे काही विशिष्ट केमिकल्स स्त्रवित होतात. ‘न्युरोट्रान्समीटर’
किंवा ‘न्युरोहार्मोन्स’ रक्ता मध्ये मिसळतात. व सर्वत्र शरीरात संचार
करतात. आणि आपला संदेश देतात कि बघा माझ्या लिव्हरमध्ये असंतुलन आहे किंवा
कधी कधी असंतुलित अवयव सुद्धा स्वत:आजारी असल्याने संदेश न्युरोनल
कनेक्शनद्वारे मुख्य मेंदूला पोचते करीत असतात. हे लिव्हर द्वारा
प्रक्षेपित झालेले संदेश आपल्या मधल्या बोटाच्या उजव्या बाजूस तीव्र
स्पंदनातील गती समजून घेतो. हे समजून घेणे कठीण असले तरी अनुभवाने सहज शक्य
आहे. आपले शरीर प्रत्येक वेळी शरीर स्थितीच्या बदलाचे संकेत व संदेश आपणास
देत असतें. आदि प्रत्येकवेळी अव्याहतपणे आपणाशी बोलत असते. तिचे प्रत्येक
स्पंदन समजून घेणे आवश्यक असते.
नाडी विज्ञान हे खरे तर स्पर्श विज्ञान
होय. आपल्या शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म भाग, शरीरक्रियाआपण प्रत्यक्ष बघू
शकत नाही हि शरीरक्रिया बघण्याचे तंत्र म्हणजे नाडीस्पंदन होय. यामध्ये
रेडियस स्टायलस त्याखाली मनगटाच्या आतील बाजूस म्हणजेच अंगठ्याच्या मुळाशी
आपण कुणीही स्वत:नाडीचे स्पंदन अनुभव करू शकतो. या नाडीच्या स्पंदनाच्या
गतीवरून त्या नाडीवर बोटाने कमी अधिक दाब देउन गतीचा बोध करून घेता येतो.
त्या ठिकाणी शेकडो संदेशाची स्पंदने असतात. आपणास त्यातील नेमकी असंतुलनाची
गती जोखता आली पाहिजे.
आयुर्वेद वात,पित्त,कफ ह्याना शरीराच्या
सर्व क्रियाप्रक्रियांना धारण करणारे मूलद्रव्य मानते. या प्रत्येकाचे
पुन्हा पाच पाच प्रकार पडतात. वाताचे जसे प्राण, उदान, व्यान, समान, अपान.
पित्ताचे पाचक, रंजक, साधक, आलोचक, भाजक. तर कफाचे अवलंबक, क्लेधक, बोधक,
तर्पक, इलेसक असे पाच पाच प्रकार पडतात. हे पंधरा प्रकारचे मूलद्रव्य
शरीराच्या सर्व सिष्टीमचे कार्य करतात. जेव्हा जेव्हा ह्यांच्या स्वस्थ
कार्यात कमी किंवा अधिकता किंवा विकृती येते तेव्हाच आजार निर्माण होत
असतो. आयुर्वेद ग्रंथात या प्रत्येकाची क्षय, वृद्धी, प्रकोप व स्वस्थ
कार्याचे वर्णन आहे. वात, पित्त, कफ ह्यांच्या गतीचे ज्ञान नाडीवरून
घेण्याचे तीन प्रकार सांगितले आहेत. जसे वाताची नाडी हि सर्पाच्या गती
प्रमाणे चालते. जेव्हा अश्या प्रकारची चाल जर नाडीची असेल तर ती नाडी
वाताची स्पंदित होत आहे. असे समजल्या जाते. जेव्हा या चालीमध्ये मंदता,
तीव्रता किंवा विकृतता असेल तेव्हा त्यांच्या क्षय,वृद्धी,प्रकोप किंवा
स्वस्थ कार्यात बिघाड आहे हे गृहीत धरून वैद्य त्यांची ग्रंथात सांगितलेली
कार्ये स्मरण करून त्या प्रमाणे त्यामधील असंतुलनाचा बोध करून घेत असतो.
तसेच पित्ताची नाडी हि उड्या मारत चालणारी खाली-वर होणारी किंवा बेडकाच्या
चालीसारखी असते. कफाची नाडी हि मंद हळूवार वाहणारी जसे हंसाच्या गती सारखी
असते. स्वस्थ गतीची वात, पित्त, कफ नाडीची गती ओळखता येऊ लागली की विकृत
किंवा असंतुलीत नाडीची गतीहि जोखता येते. वैद्य तर्जनी, मध्यमा, अनामिका या
तिन्ही बोटांनी ह्या नाडीच्या गतीचे स्पंदन वात, पित्त, कफ असे अनुभवीत
असतो.
नाडी परीक्षा वेळ : नाडी परीक्षा
सकाळच्या वेळेला केली पाहिजे. नाडी परीक्षेपूर्वी काही काळ शांत बसून
केल्या जाते. दिवसभऱ्याच्या कामाच्या श्रमाने नाडी स्पंदन वाढतात. पण
आजच्या काळात नाडी परीक्षेसाठी सकाळी येणे कोणासही शक्य होत नाही.अश्या
वेळी वैद्य रुग्णास काही काळ शांत बसण्यास सांगून मगच नाडी परीक्षा करतात.
रोगनिदान करण्यासाठी नाडीपरीक्षा करताना जेवणा नंतर, झोपले असताना, स्नान
झाल्यांनतर, उन्हातून फिरून आल्या नंतर, व्यायाम झाल्यावर,उपवास असल्यास
किंवा मद्यपान केलेले असल्यावर नाडी परीक्षेचे ज्ञान चुकीचे होतात.
नाडी परीक्षा विधी:
वैद्य डाव्या हाताने रुग्णाचा उजवा हात
मनगटाच्या सांध्याजवळ धरून आपल्या उजव्या हाताची तीन बोटे नाडीवर ठेऊन
नाडीच्या गतीचे ज्ञान करून घेत असतो ह्यावेळी प्रथम बोटांनी सर्वसाधारण
स्पर्श केल्यानंतर थोडा दाब देऊन व त्यानंतर अधिक दाब देऊन पुन्हा पुन्हा
स्पर्धा करून शारीरिक असंतुलनाचा अभ्यास घेऊन निर्णय घेत असतो.स्त्री
रुग्णाची डाव्या हाताची नाडी बघितली जाते. तर पुरुष रुग्णास उजव्या हाताची
नाडी बघावी लागते.
स्वस्थ नाडी लक्षण:
ज्या नाडीची गती स्पष्ट आहे, आपल्या
स्थानी व्यवस्थित स्पंदन करीत असेल तर तिच्यामध्ये अती चंचलता किंवा अती
मंदता नसेल तर ती स्वस्थ नाडी होय. नाडीची गती सकाळच्यावेळी स्निग्धतापूर्ण
दुपारी उष्णतायुक्त सायंकाळी धावमाना तेज तर रात्री वेगरहित गतीचे स्पंदन
होत असते. लहान मुलांमध्ये कफाची गती,तारुण्यात पित्ताची,तर वृद्धावस्थेत
वाताची गती प्राधांन्याने असते.
नाडीस्पर्श:
पित्त नाडीचा स्पर्श उष्ण,कफ नाडीचा
स्पर्श शीतल तर वात नाडीचा स्पर्श अनुष्णशीत (समसमान) असते. वात नाडी वक्र
गतीने ,पित्त नाडी उडया मारत, तर कफ नाडी मिश्रित लक्षणांची असते. ह्यातील
परस्परात मिळूनगती येत असेल तरत्याला द्वंद्न नाडी म्हटले आहे.तिन्हि दोष
बिघडलेले असतील तर सर्व गतीचे स्पंदन होते.
वेगवेगळ्या आजारातील नाडी स्पंदन:
ताप -: हात-पाय दुखत असतील तर नाडी मंद चालते. जर ताप अधिक असेल तर नाडीचे स्पंदन वाढतात. नाडीचा स्पर्श गरम लागतो.अजीर्ण -: अजीर्ण झाले असता नाडी कठीण आणि चहू बाजूने जखडल्या सारखी चालते. मंद-मंद दुर्बल असते.
मुळव्याध -: यात नाडी कधी मंद, कधी वक्र तर कधी मृदू गतीने चालते.
मलावरोध -: मलावरोध असेल तर नाडी बेडका सारखी उडया मारत चालते.
आमवात -: ह्यात नाडीची गती स्थिर व निश्चित अशी चालते.
उदरशूल -: ह्यात नाडी वक्र गतीने व वेगाने चालते.
कृमी -: पोटात जंत झाले असतील तर नाडी तिन्ही गतीने चालते.
कावीळ -: ह्यात नाडी उष्ण गुणाने व बेडकाच्या गतीने चालते.
मधुमेह -: नाडी गाठीसारख्या स्पर्शाची चालताना वाटते व सुक्ष्म गतीची जाणवते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा