आर्यभट
आर्यभट्ट
(पाचव्या
शतकात सूर्य- चंद्राचे वेध घेणारा महान भारतीय शास्त्रज्ञ)
इ. स. ४७६ (भारत)
भारताने आर्यभट्टाची जागतिक श्रेष्ठता कशी आजारामर केली?
भारतामध्ये पाचव्या शतकात एक
अलौकिक खागोलशास्त्रज्ञ होऊन गेला, अशी सर्वसाधारण माहिती काही अभ्यासू भारतीयांना होती; परंतु आर्यभट्टाचे संशोधन किती
महत्वाचे होते यासंबंधी बहुसंख्य भारतीय पूर्णपणे अंधारात होते. प्राचीन काळापासून
भारतीय शास्त्रज्ञांची एक अद्वितीय परंपरा होती व आहे; पण सर्वसाधारण नागरिकांना या
गोष्टींची काहीच कल्पना नसते! भारताने आपल्या पहिल्या उपग्रहाला ‘आर्यभट्ट’ हे नाव दिले, तेव्हा मात्र लोकांना याविषयी जाग
आली व आर्यभट्टाने कोणत्या प्रकारचे शास्त्रीय प्रयोग केले व भारताचे नाव जागतिक
शास्त्रज्ञांच्या मालिकेत कसे नेऊन बसविले हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण
झाली. परंतु तरीही अशा जिज्ञासेचा पाठपुरावा करून संपूर्ण अथवा अंशतः माहिती
मिळविण्याइतका उत्साह, तत्परता, किती भारतीयांमध्ये आहे, याचा उहापोह कारणाचे हे स्थळ
नव्हे. मात्र खागोल विज्ञानात भारतीय नागरिक धार्मिक भावनेमुळे व वृथा
अंधश्रद्धेमुळे जगाच्या मागे राहिले व अजूनही फार मोठ्या प्रमाणात आपला देश
याबाबतीत अंधश्रद्धेने ग्रासलेला आहे हे कटू सत्य होय.
राहू वा केतू यांनी ग्रासल्यामुळे
सूर्य, चंद्र यांना ग्रहण
लागते या कल्पनेवर विश्वास असलेले लक्षावधी भारतीय नागरिक या ग्रहण काळात ‘ दे दान सुटे गिरान ’ या गर्जनांचा ऐकू घेणारा घोष हे
काय दर्शवितात? मागे झालेल्या खग्रास
सुर्यग्रहणापासून मुंबईसारख्या सुजान शहरातील लाखो सुबुद्ध नागरिकांना
कड्या-कुलुपांच्या बंदोबस्तात कोंडून ठेवणाऱ्या धार्मिक नेत्याकडे पाहिले असता, आर्यभट्ट नावाच्या एका भारतीय
शास्त्रज्ञाने १५०० वर्षापूर्वी भरसभेत सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यासंबंधी
प्रात्यक्षिक दाखवून निरुपण केले व थोड्याच अवधीत आर्यभटीका हा ग्रंथही प्रकाशित
केला यावर कोणाचा विश्वास बसेल का ?
पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची भ्रमण गती व परिभ्रमण
गती यासंबंधी स्पष्ट काल्पना ज्याने त्या काळात मांडली, त्याचे नाव भारताच्या पहिल्या
उपग्रहाला दिले जावे हे सर्वथैव उचित आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा