संख्या
संख्या
संख्या मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे.प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हटले आहे. हेच अंक म्हणजे (एक ते नऊ आणि शून्य) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताची जगाला देणगी आहे. "आसा' या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात राहणाऱ्या भारतीय गणितज्ज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकाच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या "आसा' यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा पद्धतीने लिहिलेले आकडे हिंदासा नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः इ.स. ५०० च्या सुमारास आर्यभट्टकृत दशमान पद्धतीचा प्रसार झाला. शून्यासाठी ख या शब्दाचा वापर केला गेला. नंतर त्याला शून्य असे संबोधले गेले.
इंग्लिश पद्धतीत थाउजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक आहेत.
विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीय दशमान पद्धतीनुसार आकडे खालीलप्रमाणे लिहिले जातात-
- १ एक
- १० दहा
- १०० शंभर
- १००० हजार
- १०,००० दहा हजार
- १०,००,०० लाख
- १०,००,००० दहा लाख
- १,००,००,००० कोटी
- १०,००,००,००० दहा कोटी
- १००,००,००,००० अब्ज
- १० चा १० वा घात खर्व (दश अब्ज)
- १० चा ११ वा घात निखर्व
- १० चा १२ वा घात पद्म
- १० चा १३ वा घात शंकु (नील)
- १० चा १४ वा घात जलधी (दशनील)
- १० चा १५ वा घात अंत्य
- १० चा १६ वा घात मध्य
- १० चा १७ वा घात परार्ध (शंख)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा